वकील काळया रंगाचा कोट का घालतात ?* वकिलांच्या ड्रेस कोडची सुरुवात एडवर्ड तिसरा याने १३२७ साली केली. त्याकाळी रॉयल कोर्टामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक न्यायाधीशासाठी एक पेहराव असावा असे सुचवले. पुढे १३ व्या शतकाच्या समाप्तीपर्यंत त्याने ठरवलेला पेहराव काहीसे बदल करून बंधनकारक करण्यात आला. त्याकाळी सार्जंट आपल्या डोक्यावर केसांचचा विग घालून बसायचे आणि सेंट पेल्सकॅथेड्रलमध्ये प्रॅक्टिस करायचे. तेव्हा वकिलांची स्टुडंट, प्लीडर, बेंचर आणि बॅरिस्टर या चार भागांमध्ये विभागणी करण्यात आली होती. त्या काळात सोनेरी लाल कपडे आणि खाकी रंगाचा गाऊन परिधान केले जात असे.इंग्लंडचा राजा एडवर्ड तिसरास्रोत१६०० साली या ड्रेसकोडमध्ये काहीसा बदल झाला आणि १६३७ साली प्रीवी काऊन्सीलने सांगितलं की,समाजानुसार न्यायलयाने कपडे परिधान केले पाहिजेत.तेव्हापासून वकिलांनी पूर्ण अंग झाकले जाईल एवढ्या लांबीचा गाऊन घालण्याची प्रथा सुरु झाली. तेव्हा असं मानण्यात यायचं की, गाऊन आणि विग न्यायाधीश आणि वकिलांना इतर व्यक्तींपासून वेगळं दर्शवतात.१६९४ साली राणी मेरीच्या मृत्युनंतर राजा विल्यम याने सर्व न्यायाधीश आणि वकिलांना...
8 मार्च, जागतिक महिला दिन निमित्ताने नारी शक्तीला सलाम 🫡 महिलांचे हक्क- १. पालनपोषणाचा हक्क (Right to Maintenance): प्रत्येक विवाहित महिलेला तिच्या पतीकडून आर्थिक आधार मिळण्याचा हक्क आहे, जरी ती त्याच्यासोबत राहत नसली तरीही. हिंदू विवाह अधिनियम, १९५५ (Hindu Marriage Act, 1955) आणि महिलांचे घरगुती हिंसापासून संरक्षण कायदा, २००५ (Protection of Women from Domestic Violence Act, 2005) या कायद्यांतर्गत हा हक्क संरक्षित केला आहे. २. समान वेतनाचा हक्क (Right to Equal Pay): भारतात समान वेतन कायदा, १९७६ (Equal Remuneration Act, 1976) हा कायदा लागू असून पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन मिळावे याची हमी देतो. ३. प्रतिष्ठा आणि सन्मानाचा हक्क (Right to Dignity and Decency): संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला, महिलांसह, प्रतिष्ठेने आणि भयमुक्त जीवन जगण्याचा हक्क आहे. भारतीय न्याय sanhita अंतर्गत महिलांचा छळ बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे. ४. घरगुती हिंसापासून संरक्षणाचा हक्क (Right against Domestic Violence): घरगुती हिंसा प्रतिबंध क...